श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने धर्मेवाडी येथे वृक्षारोपण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व आदरणीय नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प एक कोटी महावृक्षलागवड व संवर्धन या उपक्रमांतर्गत तालुक्यातील धर्मेवाडी येथे वृक्षारोपण आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र रेदासनी, डॉ यशवंत राजेभोसले, पांडुरंग चांडक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून वीस टक्के अध्यात्म व ऐंशी टक्के सामाजिक उपक्रम ग्रामाभियानातील विविध अठरा विभागामार्फत घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज धर्मेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या मंगल कार्यालयाच्या परिसरात हे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणासाठी वनविभाग तसेच गटविकास अधिकारी एस जी हजारे साहेब यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले यावेळी माजलगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी व धर्मेवाडी येथील ग्रामस्थ सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.