ताज्या घडामोडी

जायकवाडीचे पाणी मिळेना;पिके करपू लागली शिवसेना उबाठाचे उपजिल्हा प्रमुख धर्मे यांचा आत्मदहणाचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील जवळपास विस गावे ओलीता खाली येत असलेल्या बी ५९ या चारीवरील काही गावांना या पुर्वी डिसेॆंबर मधील आणि आता जानेवारी महिण्यातील पाणी पाळी मिळाली नसल्याने गहू,हरबरा, ऊस ही पिके वाळत असून १ फेब्रुवारी पर्यंत पाणी पाळी नाही दिल्यास येथील जायकवाडीच्या उपविभागिय कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा शिवसेना उबाठा चे उपजिल्हा प्रमुख रविंद्र धर्मे यांनी गुरुवार ३० जानेवारी रोजी निवेदना व्दारे येथील जायकवाडी उपविभागाच्या उपविभागिय अभियंत्यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडी पाण्याचे दुसरे आवर्तन चालु झाले असतांना देखील बी-५९ लिंबा वितरीकेला अद्याप पर्यंत पाणी सोडण्यात आलेले नाही. पहिले आवर्तन देखील या वितरीकेवरील लोणी, कानसुर, लिंबा या गावातील शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे त्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या दुसरे आवर्तन सुरु असतांना मागील १५ दिवसापासून वरील गावातील शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पाणी मिळत नाही. त्यामुळे सदरील शेतकऱ्याचे जायकवाडी पाण्याच्या भरावशावर पेरणी करण्यात आलेला गहू,हरबरा, ऊस आदी पिके पाण्या अभावी करपत आहेत. आपणास वारंवार विनंती करुन देखील आपण याची दखल न घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आपण दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ च्या आत बी-५९ लिंबा वितरीकेला पाणी न सोडल्यास दि. १ फेब्रुवारी वार शनिवार या दिवशी शेतकऱ्यांच्या हितासाठी मी आपल्या कार्यालया समोर आत्मदहन करणार आहे.
याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा माझ्या जीवीतास काही धोका झालयास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर व आपल्या कार्यालयावर राहील.असे निवेदन रविंद्र धर्मे यांनी दिले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close