सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारेंचा थाटात पार पडला सत्कार सोहळा
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील कोरपणा महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पांडुरंग पचारे हे काल शुक्रवार दि.३१मार्चला वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.त्यांचे सेवानिवृत्त निमित्त कोरपणा तहसिल कार्यालयाचे कर्मचारी बांधव व तालुक्यातील पटवारी वर्गांकडून सेवानिवृत्त मंडळ अधिकारी पचारे यांचा सत्कार सोहळा काल तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.या थाटात पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रामुख्याने कोरपणाचे तहसिलदार महेन्द्र वाकलेकर, जिवतीचे प्रभारी तहसिलदार प्रविण चिडे , नायब तहसिलदार संजय भगत ,गडचांदूरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण राजेंद्र पचारे यांचे अर्धांगिनी ज्योतीताई पचारे ,या शिवाय पटवारी विरेंद्र मडावी , तलाठी लक्ष्मीकांत मासिरकर , विशाल कोसनकर,संजय कुडमेथे , पटवारी रोशनी कोल्हे ,अमोल गोसाई,आदीं उपस्थित होते.