ताज्या घडामोडी

एटापल्लीत वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण

मिळालेल्या संधीचा चांगला विनियोग करा: आ धर्मराव बाबा आत्राम

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

एटापल्ली अतिदुर्गम व मागास भागातील वनहक्क पात्र दावेदारांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात आले.आता वनहक्क पट्टे मिळाले असून विविध योजनांची जोड देऊन मिळालेल्या संधीचा चांगला विनियोग करा,असे आवाहन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. एटापल्ली तालुका मुख्यालयात वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करताना ते बोलत होते.
यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, जि प सदस्य ज्ञान कुमारी कौशी, पंचायत समितीचे सभापती बबीता मडावी, उपसभापती जनार्दन नल्लावर, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी डॉ ज्ञानेश्वर गहाने, माजी पंचायत समिती सभापती बेबी लेकामी,सपना कोडापे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या एटापल्ली तालुका अध्यक्ष ललिता मडावी, शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार,सरपंच राजू नरोटे, सरपंच रीना मडावी,सरपंच वासुदेव गेडाम,सरपंच तुळशीराम मडावी,सरपंच पूनम लेकामी तसेच विविध विभागाचे प्रमुख तथा राकाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो.वन नदी,नाल्यांनी वेढलेले निसर्गरम्य वातावरण असलेला हा जिल्हा आहे. स्थानिकांचा मूळ व्यवसाय हा शेती असून आदिवासी व इतर जमातींना उदरनिर्वाह होण्याच्या दृष्टीने शासनाने अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी वनहक्क कायदा 2006 अस्तित्वात आणला. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील पात्र दावेदारांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी म्हणून वन हक्क प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज असून यातून निश्चितच आपले आर्थिक उत्पन्न वाढेल, असेही आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले.
यावेळी एटापल्ली तालुक्यातील एकरा, गेदा, चंदनवेली, बेसेवाडा, तांबडा, जीवनगट्टा, बुर्गी उडेरा,वासामुंडी, अबनपल्ली, जीवनगट्टा, गुरुपल्ली, बारसेवाडा आदी गावातील 38 आदिवासी शेतकरी बांधवांना वनहक्काचे पट्टे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close