ताज्या घडामोडी
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी, दि.20 /02/2025
मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी बालासाहेब चौलवार, नायब तहसिलदार शितल कच्छवे आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.