दिव्यांग मित्र बहुउद्देशिय संस्थाच्या शिष्टमंडळाने घेतली सहाय्यक जिल्हाधिका-यांची भेट !

सादर केले मागण्यांचे निवेदन !
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूर तहसील कार्यालयात अपंगांच्या सेवा व सुविधेसाठी दिव्यांग कक्ष सुरु करण्या gaत यावा सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी ,रॅलिंग रॅम्प तयार करण्यात यावे , स्वंतत्र खिडकी व्यवस्था करण्यात यावी, रेशन कार्ड साठी दुमजल्यावरची व्यवस्था खाली करण्यात यावी तहसील कार्यालय परिसरातील दलालांचा सुळसुळाट थांबवावा आदीं मागण्या बाबत येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम .(भा.प्र.से.)यांची दिव्यांग मित्र बहुउद्देशिय संस्था चंद्रपूरच्या एका शिष्टमंडळाने भेट घेत त्यांचेशी सविस्तर चर्चा केली व त्यांना उपरोक्त मागण्यांची पूर्तता करण्यासाठी एक लेखी निवेदन आज मंगळवार दि.१५नोव्हेंबरला देण्यात आले . या वेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष इन्टरनॅशनल खेळाडू दिलीप या.मिश्रा ,सुधिर खोब्रागडे,महेन्द्र शेरकी ,संजू गोंड ,राजेश यादव ,हरीश मांडाळे,विद्या डारला,कलाबाई पेटकुले आदीं उपस्थित होते.या वेळी तहसील स्तरावरील मागण्या सोडविण्याचे आश्वासन सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम .यांनी शिष्टमंडळाला दिले. यापुर्विचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना सुध्दा याच मागण्यांच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी निवेदन सादर करण्यात आले होते .