ताज्या घडामोडी

पेडगाव येथे लाईफ केअर हॉस्पिटलचे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पेडगाव येथे डॉ. अशफाख पठाण यांच्या “लाईफ केअर हॉस्पिटलचे” उद्घाटन पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकर यांच्या हस्ते व मा. बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य मुंजाभाऊ गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेशनाना देशमुख, माजी पं. स. सदस्य दिलीपराव साबळे, माजी सरपंच नारायण देशमुख, अंबादासराव सुरवसे, मनोज राऊत, सुमंत वाघ, कांतराव देशमुख, चेअरमन दिपकराव देशमुख, शेख रसूल भाई, मधुकरराव खरवडे, सरपंच आशिष हरकळ, उपसरपंच शेख सलमान, बाबुभाई यांच्यासह पेडगाव व परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थित होती.


पेडगाव येथिल मेन रोडवर सुरू होत असलेल्या या सुसज्ज अशा 10 बेडच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून पेडगाव व परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. पेडगाव येथील प्रसिद्ध व्यापारी अजीमभाई पठाण यांनी आपल्या मुलाला वैद्यकीय शिक्षणाची डिग्री पुर्ण करून आपल्या गावीच वैद्यकीय सेवा देण्याचा मानस व्यक्त केला व त्याला प्रतिसाद देत डॉ. अशफाख यांनीही आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आज पेडगाव येथे सुसज्ज असे हॉस्पिटल सुरू केले. डॉ.अशफाख यांच्या माध्यमातून भविष्यात या परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या प्रसंगी मनापासुन शुभेच्छा.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close