भरस्त्यात डिझेल टँकर ला आग

तालुका प्रतिनिधी – सनम टेंभुर्णे
ब्रम्हपुरी येथील श्री. साई पेट्रोल पंप च्या मालकीचे ट्रक क्र. MH 34 BG7979 हे टँकर ट्रक ब्रम्हपुरी नागभीड या राज्यमहामार्गावर KCC या कंपनी ला डिझेल पुरवठा करायला गेला होता. सायंकाळी 5 वाजता च्या दरम्यान KCC कंपनी च्या गेट वर पोहचताच टँकर ला अचानक आग लागली. आग लागल्याचे कडताच परिस्थिती समजून टँकर चालकणे ट्रक राज्यमहामार्गाच्या बाजूला लावला आणि स्वतः ट्रक च्या लगेच खाली उतरून स्वतःचे जीव वाचवले. यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली. ट्रक पेट घेऊन आग मोठी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले व आग आटोक्यात आणली.

श्री. साई पेट्रोल पंप देलाणवाडी यांच्या मालकीचे या ट्रक मध्ये सुमारे सहा हजार लिटर डिझेल होते असे प्राथमिक माहिती प्राप्त झाली. यामुळे श्री. साई पेट्रोल पंप देलणवाडी मालकाचे फक्त ट्रक चे जवळपास 60 लाखाचे नुकसान झाले अशी माहिती मिळाली आहे.









