ताज्या घडामोडी

कोलारा तु ग्राम पंचायत येथे विधीमंडळ समितीने घेतली आढावा बैठक

महाराष्ट्र विधीमंडळ ने केले ग्राम पंचायत सदस्यांचे कौतुक

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

कोलारा गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला कोलारा गावात अनेक,दिग्गज नेते, सिनेकलाकार,क्रिक्रेट खेळाळू, तसेच देश विदेशातील लोक येत असतात अस्यातच नुकतात दिनाक २० ऑगष्ट ला केन्द्रीय समिती ने कोलारा गावाला भेट दिली आणि चंद्रपूर जिल्हाच्या दौरावर असलेले महाराष्ट्र विधिमंडळ समिती ने आज 3 ला ग्रामपंचायत कोलारा तु येथे भेट देत आढावा बैठक घेण्यात आली,यावेळी समितीत आमदार रामदास आंबडकर,आमदार दादाराव केचे, आमदार विक्रमसिह सावंत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या ग्राम पंचायत कोलारा तु च्या वतीने महाराष्ट्रविधी समिती याच्या शॉलश्रीफळ ,पुष्प गुच्च,देऊन स्वागत करित ग्राम पंचायत सभागृहात आढावा बैढक सपन्न झाली
ग्रामपंचायती अंतर्गत नाला खोलीकरण रोजगार हमी कामाची पाहणी केली,
मनरेगा मध्ये विविध योजना राबविल्या जातात त्यात गुराचा गोटे,सिंचनविहीर,घरकुल,बोडी खोलीकरण, शोष खडे,अभिसरण,वृक्ष लागवड,रोपवाटीका,फळबाग इत्यादी योजना राबवली जाते मात्र लाभार्थ्यना लाभ न मिळाल्याने आणि अपूऱ्या माहीती अभावी विधीमंडळ समितीने अधिकाऱ्याचा तासीका घेत लवकरात लवकर आराखाडा तयार करुन लाभार्थीना लाभ मिळाला पाहीजेत अशी सुचना अधिकाऱ्याना दिल्यात गावातील विविध विषयी आपले समस्या व अधिकाऱ्याकडून माहीती आम्हा मिळत नसल्याने लाभार्थ्यना दोन वर्षापासुन विविध योजनेचे फाईल पंचायत समिती स्तरावर पडून असल्याने आम्हा गुराचे गोटे,इत्यादी समस्याचे अरविंद बावनकर यानी विधिमंडळ समिती समोर व्यथा सांगीतले तेव्हा महाराष्ट्र शासनाचे विविध योजनेचा लाभ प्रत्येक नागरीकाना मिळाला पाहीजेत अशी सुचना चिमुर तालुक्यातील सर्व अधिकाऱ्याना दिली,ग्राम पंचायत कोलारा तु येथे आढावा बैठकीत महाराष्ट्र विधीमंडळ समिती यांच्या सह चिमुर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी संकपाल,प्रभारी तहसिलदार कोवे,गट विकास अधिकारी साळवे,आरफो नैताम,तालुका कृषी अधिकारी तिके,पंचायत समिती सभापती लता पिसे ,सिचन विभाग,आरोग्य विभाग,आदी विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते , आढावा बैढकीचे नियोजन ग्राम पंचायत कोलारा तु येशिल उपसरपंच सचिन डाहूले, सदस्य गणेश येरमे, सदस्य अविनाश गणविर, ग्रामसेवक केशव गजभे, संगणक चालक शत्रुघन दडमल,प्रफुल वाघमारे, संजय गुळ्धे आदीने परीश्रम घेतले .सुत्रसंचालन साळवे तर आभार सदस्य गणेश येरमे यानी केला, महाराष्ट्र विधीमंडळ समिती कडून ग्राम पंचायत कोलारा तु येशिल नवनिर्वाचीत तरुणयुवक सदस्य ना पूढील वाटचाली करिता शुभेच्छा देत मासळ, मदनापूर ,सिन्देवाही कडे प्रस्तान झाले
” आमच्या गावला देश विदेशातले नागरीक भेट देतात आम्हा गाव वासीयाना कडून स्वागत आहे,पहील्यांदाच ग्राम पंचायत कोलारा तु समितीत माझ्या सर्व सदस्य,सुशक्षीत,व तरुण आहेत,आणि ग्रामस्थानाचा सहकार्य असल्यानेच गावाचा विकास करता येत आहे :उपसरपंच सचिन डाहूले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close