महाशिवरात्रीनिमित्त परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर येथे भरगच्च कार्यक्रम


जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी
शुक्रवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी महाशिवरात्रीनिमित्त परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त श्री साई स्मारक समिती पाथरीचे विश्वस्त श्री संजय भुसारी, यांच्या शुभहस्ते साईबाबांच्या तळघरातील श्रीशंकराला महाभिषेक करण्यात आला. प्रसंगी समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त ॲड. श्री अतुलराव चौधरी, परम साई भक्त श्री नितीनजी ग्रामले, सौ प्रज्ञा चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नारायणराव कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी ॲड.श्री मुकुंदराव चौधरी श्री प्रभाकरराव पाटील, श्री बालाजी बेद्रे, श्री अजय गुरुजी पाथरीकर शास्त्री, मंदिर अधीक्षिका सौ. छायाताई कुलकर्णी, कु. राजलक्ष्मी चौधरी, सौ सुजाता डहाळे, सौ शिवकन्या नागठाणे, सौ कलाबाई कांबळे, कमलबाई तेलंगे इत्यादींची उपस्थिती होती. अभिषेक पूजेचे पौरोहित्य श्री योगेश गुरुजी इनामदार वाळूजकर शास्त्री यांनी केले. दुपारी मध्यान्ह आरती नंतर साई भक्तांना साबुदाण्याच्या उसळीचा महाप्रसाद करण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन ते पाच या वेळेत श्री ह भ प अशोक महाराज पुरी यांचे महाशिवरात्रि विशेष किर्तन झाले. या कीर्तनास वय वर्ष 12 असलेले बाल मृदंगाचार्य वैभव महाराज सोगे यांनी मृदंगाची साथ संगत केली. तसेच नामदेव महाराज मस्के, दत्ता महाराज साबळे व बाबा महाराज हिवाळे यांनीही गायनाची साथ संगत केली. सायंकाळी धुपारतीनंतर महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.
अशी माहिती श्री साई स्मारक समितीचे प्रताप आमले यांनी दिली.