बोंड येथे तालुका स्तरीय बालक्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव उद्घाटन
तालुका प्रतिनिधी: कल्यानी मुनघाटे नागभीड
प्रयत्न करणाऱ्यांना कधीही अपयश येत नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा करीत विजयाच्या संकल्पाची मशाल प्रज्वलित करा , त्यानंतर जगातील कुठलीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकणार नाही असे प्रतिपादन चंद्रपुर जि.प.चे माजी सदस्य संजय गजपुरे यांनी तालुका स्तरीय बालक्रिडा स्पर्धा तथा सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. संघभावना , सहकार्य आणि जिद्दीचा उत्कृष्ट संदेश देणारी ही क्रिडास्पर्धा असुन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ यातून उपलब्ध होत असल्याने बीटस्तरीय व तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी जिल्हा परिषद कडुन वाढीव निधीची तरतुद करण्यासाठी प्रयत्न करण्याची हमी संजय गजपुरे यांनी यावेळी दिली .
नागभीड तालुक्यातील बोंड येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत आयोजित तालुकास्तरीय शालेय बालक्रिडा स्पर्धा तथा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बोंड च्या सरपंच सौ. निशाताई जयतराम सिडाम या होत्या. उपस्थित अतिथींच्या हस्ते क्रिडाज्योत प्रज्वलीत केल्यानंतर पथसंचलानाद्वारे विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. नियोजित उद्घाटक आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या अनुपस्थितीत त्यांचा वतीने संजय गजपुरे यांनी या महोत्सवाला यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर उपसरपंच जगदिश पाटील राऊत , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सुनिता भंडारे , पंचायत विस्तार अधिकारी धुर्वे साहेब, माजी पंचायत समिती सदस्या श्रीमती मायाताई राऊत ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद गोहणे , उपाध्यक्ष सौ.मोहिनी मोरांडे , ग्रा.पं.सदस्य जयतराम सिडाम , अतुल नागोसे , शितल राऊत , ग्रामसेवक प्रशांत दोडके , तंटामुक्त समिती अध्यक्ष ज्ञानदेव रहाटे , माजी सरपंच विनोद तुपट व सौ. उज्वला बनकर , बाळापुर बुज. चे माजी सरपंच धनराज बावनकर व विनोद गोंगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महोत्सवाच्या संमेलनाध्यक्ष नागभीड पंचायत समिती च्या संवर्ग विकास अधिकारी श्रीमती स्नेहल लाड यांनी योग्य ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी लक्ष्य निर्धारीत करीत जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला तसेच या महोत्सवाच्या यशासाठी मदत व प्रयत्न करणाऱ्या गावकरी व विविध संस्थांचे आभार व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील शिक्षण विभागाच्या योजनांची व उपक्रमांची सविस्तर माहिती या महोत्सवाचे सचिव व गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांनी दिली. या सोहळ्याचे कार्याध्यक्ष व बोंड शाळेचे मुख्याध्यापक राज एकवनकर सर यांनी अतिथिंचे स्वागत केले. तालुक्यातील पाच बीटातील प्रथम क्रमांक पटकावलेले वैयक्तिक स्पर्धक व सांघिक संघ यात सहभागी झाले आहेत.
उद्घाटन सोहळ्याचे संचलन धुर्यकान्त बनकर सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार केंद्रप्रमुख भारत बोरकर सर यांनी मानले . तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी स्वप्नपुर्ती गृपच्या युवक व युवतींचे विशेष सहकार्य लाभले असून गावातील सर्व बचत गट यांचीही मदत घेण्यात आली आहे.