श्री साईबाबा जन्मस्थान मंदिरात दीपावली महोत्सव
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कोरोना आजाराच्या संसर्गामुळे मंदिर बंद असल्यामुळे भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी अतिशय उत्सुक होते दिनांक 7. 10.2021 पासून शासनाने मंदिर दर्शनार्थी साठी उघडण्यास परवानगी दिली.
मंदिर उघडण्यात आल्यावर साईबाबांचा पुण्यतिथी महोत्सव कोरोना संसर्गाच्या नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला. त्यानंतर सोमवार दिनांक 1.11. 21 रोजी वसुबारसेला पहाटे काकड आरती मंगल स्नान झाले. परभणीचे दानशूर साईभक्त सागर युवराज पातुरकर यांनी साईबाबांना गोदान केले होते. वसुबारसेला संध्याकाळी पाच वाजेच्या शुभमुहूर्तावर गोमातेस गोरा झाला. गोमाता व वासराचे पूजन सौ छाया कुलकर्णी मंदिर अधीक्षक यांच्या शुभहस्ते करण्यात आले . गुरुवार दिनांक 4.11.21 रोजी नरकचतुर्दशीला दिवाळीच्या फराळाचा नैवेद्य श्री साई बाबांना अर्पण करण्यात आला अडवोकेट अतुल चौधरी कार्यकारी विश्वस्त एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी, मंदिर अधीक्षक सौ छाया कुलकर्णी यांच्या उपस्थितीतीत एडवोकेट मुकुंदराव चौधरी कार्यकारी अधिकारी यांचे शुभहस्ते लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम झाला.
शुक्रवार दिनांक 5.11.21 रोजी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ एडवोकेट अतुल चौधरी कार्यकारी विश्वस्त हस्ते सपत्नीक करण्यात आला. दीपोउत्सवाची सुरुवात साईबाबाचे परम भक्त कै. रामभाऊ कोक्कर पाथरी यांनी सन 2007 ला सहपरिवार केली. होती .रामराव कोक्कर यांचे नंतर तीच परंपरा त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती तनुजा रामराव कोक्कर रवी रामराव कोकर रोहित रामराव कोक्कर परिवाराने चालू ठेवली आहे.यावर्षी 11000 दिवे लावणयात आले. प्रसिद्ध रांगोळी कलाकार सखाराम बनसोडे परळी यांनी सुरेख रांगोळी काढली. साईमंदिरात त्यांचा सत्कार अॅड. अतुल चौधरी कार्यकारी विश्वस्त यांचे शुभहस्ते करण्यात आला.अशी माहिती सौ. छाया कुलकर्णी मंदिर अधीक्षक यांनी दिली .