ताज्या घडामोडी

सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या महातपुरी येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची शनिवारी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट घेऊन सांत्वन केले.

महातपूरी येथील ज्येष्ठ शेतकरी कै.संभाजी माणिकराव जानकर यांनी सरकारी व खाजगी सावकाराच्या कर्जास कंटाळून व नापिकीमुळे दोन दिवसापूर्वी विष पिऊन आत्महत्या केली. वारकरी सांप्रदायात सर्वदूर परिचित असलेले संभाजी महाराज यांनी आत्महत्या केल्याने ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील वारकरी मंडळीही दुःख सागरत बुडाले. ही घटना परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांना समजताच त्यांचे सहकारी ग्राहक पंचायत चे तालुका सचिव मुंजाभाऊ लांडे यांच्यासह त्यांनी शनिवारी महातपुरी गाठली .कै संभाजी महाराज यांचे बंधू अशोक जानकर व मुलगा रमेश जानगर यांची भेट घेऊन सांत्वन केले. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे दिली जाणारी मदत मिळावी यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी विनंतीहि केली. यावेळी जि प सदस्य बंशी मुलगीर यांचे वडील त्र्यंबकराव मुलगीर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close