मिंडाळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे विस्तारीकरण बांधकामाचे भुमीपुजन संपन्न
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड तालुक्यातील पारडी- बाळापुर जि.प.क्षेत्रातील मिंडाळा हे मध्यवर्ती स्थान असुन परीसरातील प्रत्येकच गावात शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. मिंडाळा येथील पशुवैद्यकीय उपकेन्द्राच्या इमारतीची दुरावस्था झाल्याने तिथे राहुन काम करणे दुरापास्त झाले होते. याची माहिती तत्कालिन उपसरपंच व विद्यमान ग्रा.पं.सदस्य विनोद हजारे यांनी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्याकडे दिली . जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या माध्यमातुन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी जिल्हा निधीतुन सदर कामासाठी निधी मंजुर करवुन घेतला . यात नवीन शेड , इमारत दुरुस्ती , पेवर ब्लॅाक लावणे , ईत्यादी कामांचा समावेश असुन याचे भुमीपुजन संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर निधी मंजुर केल्याबद्दल जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी सोमनाथे साहेब यांचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी याप्रसंगी आभार मानले.
याप्रसंगी ग्राम पंचायत मिंडाळा चे सरपंच गणेशभाऊ गड्डमवार , सचिव श्रीमती एस.के. उईके तसेच ग्राम पंचायत सदस्य वालिश लाऊत्रे , सौ. सुषमाताई ठाकरे, सौ. चित्राताई मांदाडे ,पशूधन पर्यवेक्षिका दोनाडकर मॅडम तसेच ग्राम पंचायत कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.