बेरोजगारी व उपासमारी टाळण्यासाठी मागितली बँड वाजविण्याची परवानगी
शहर प्रतिनिधी : पुरुषोत्तम वाळके चिमुर
मागील लॉकडाऊन व सध्याची स्थिती पाहता आम्ही वाजंत्री (बँड वाजविणारे) लोकांवर खूपच बेरोजगारी व उपासमारी ची वेळ आलेली आहे. तरी आम्हास बँड वाजविण्याची परवानगी द्यावी अशी वाजंत्री लोकांतर्फे किशोर उकुंडे नेरी यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे.
सध्या कोविड प्रादुर्भाव महाराष्ट्रात कमी होत आहे व जवळपास सर्व आस्थापणास ते खुले करण्यास परवानगी मिळाली आहे. पण आम्हा बँड वाजविणाऱ्याना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्हांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे. कृपया आम्हास कार्यक्रमात व इतर जरुरी ठिकाणी बँड वाजविण्याची परवानगी देण्यात यावी. आम्ही कोविड नियमांचे पालन करून आपले बॅण्ड वाजवून उदरनिर्वाह चालवू, अशा आशयाचे विनंतीवजा पत्र एस डी ओ चिमुर मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना शिव सेना च्या लेटर हेड वर देण्यात आले आहे.
यावेळी प्रितम डोंगरे, हर्षद डोंगरे, संदीप बावने, शंकर ऊकुंडे हे उपस्थित होते.