मासळ महिला उत्पादक कंपनी जिल्ह्यात अव्वल
प्रतिनिधी:हेमंत बोरकर
कंपनीचा अभिनव उपक्रम
ग्रामविकास विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शन मध्ये मासळ महिला उत्पादक कंपनी यांना पालकमंत्री अशोक उइके यांचे हस्ते प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी उत्पादित कंपनीच्या संचालिका मनीषा गराटे व लीना राऊत यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
कंपनी मार्फत मागील वर्षाभारत धान खरेदी विक्री व्यवसाया मधून १३ लाख रुपयांचा फायदा मिळवून दिला आणि चालू वर्षात नव्याने “क्रांती श्री” या ब्रॅण्ड च्या नावाने प्रक्रियायुक्त तांदूळ व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. शुद्धता व दर्जेदार पणा मुळे तांदळाला इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील महिला स्वयसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित वस्तूचे विक्री प्रदर्शन चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी उत्पादक कंपनीचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधाकर आडबले, किशोर जोरगेवार, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, प्रकल्प संचालक गिरीश धायगुळे आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मासळ महिला उत्पादक कंपनीच्या यशस्वितेसाठी अर्चना बोनसुले, विवेक हरणे, सुरेश धारणे, सुधीर ठेंगरी, हेमचंद बोरकर, सविता उईक, अल्का इनवते, दिपाली दोडके शुभम रामटेके, प्रफुल मेश्राम आदींनी सहकार्य केलेत..