स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी विदर्भ आटो रिक्षा संघटनेची रॅली
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी आटो रिक्षा रॅलीचे आयोजन स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
वरोरा शहरातील पोलीस स्टेशन ,जाजू हॉस्पिटल,माढेली नाका,डोंगरवार चौक,मित्र चौक,नेहरू चौक,आंबेडकर चौक,रत्नमाला चौक,शिवाजी चौक,चांडक चौक,या मार्गाने पादक्रमन करून आनंदवन चौकात रॅलीचा समारोप
झाला.याठिकाणी रॅलीमध्ये सुरक्षतेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था चोख ठेऊन सहकार्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक खोब्रागडे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक चवरे साहेब,मडावी साहेब,आणि बेलसरे साहेब या पोलीस अधिकाऱ्यांसह अँबुलन्स चालक मालक यांचा सर्व आटो-चालक-मालक संघटनेकडून स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला..याप्रसंगी आटो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अरविंद तिखट,उपाध्यक्ष -प्रमोद धोपटे, सचिव-मधुकर राऊत,कोषाध्यक्ष -बाबा खंडाळकर,विलास खापने, रमेश सनस,फारुख शेख,आमीन शेख,मोटू गुप्ता,विलास पेंदे,राजू कुमरे,आदि उपस्थित होते.