श्रीकृष्ण को – ऑप बँक शाखा चिमूर चा उदघाटन सोहळा संपन्न
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
श्रीकृष्ण को – ऑप बँक लि.उमरेड शाखा चिमूर चा सोहळा उदघाटन सोमवार दि .०७.०६.२०२१ रोजी देशमुख कॉम्लेक्स वडाळा चिमूर येथे संपन्न झाला त्या प्रित्यर्थ श्री मानणीय बँकेचे अध्यक्ष सुभाषजी देवाळकर यांच्या हस्ते फीत कापून बँकेचे उदघाटन करण्यात आले . तसेच उपस्थितांचे स्वागत करून बँकेची प्रस्थावना सादर केली , बँकेत उपलब्ध असलेले कर्ज योजना , जमा योजना , चालू खाते , बचत खाते याशिवाय अन्य सेवाजसे लॉकर्स , ATM कार्ड , RTGS / NEFT / IMPS , विदयुत बिल भरणा केंद्र SMS सेवा इत्यादी सेवांचा लाभ घेण्याविषयी माहिती दिली . बँकेकडून ग्राहक सेवा उत्तम प्रकारे दिल्या जाईल असे ग्राहकांना अस्वासीत केले . सन्माननीय चिमुरचे प्रतिष्टीत डॉ . संजयजी बोढे यांनी आपल्या मनोगतमध्ये या बँकेत पैश्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसे ठेवणे अधिक योग्य- या बँकेच्या ब्रीद वाक्यापासून सुरवात करून मार्गदर्शन केले , बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभारप्रदर्शन श्रीमान बँकेचे उपाध्यक्ष प्रशांतजी ब्रम्हे यांनी केले . उपस्थितांना अल्पउपहार देऊनउदघाटन सोहळा संपन्न करण्यात आलावबँकेच्या कामकाजालासुरवात करण्यात आली , तसेच पहिल्याच दिवशी ग्राहकाकडून बैंकला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व प्रथम दिनीस जास्तीत जास्त ठेवी प्राप्त झाल्या करिता चिमूर वासियांचे आभार मानण्यात आले , कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री . ईश्वरजी देशमुख , श्री नत्थूजी बोढे , श्री . मुन्नाजी असावा , श्री . सोपानजी खोडके , श्री . डॉ . संजयजी बोढे , वर्च्यूअल गॅलक्सी चे उपाध्यक्ष श्री . देशमुख , श्री ज्ञानेश्वरजी किमतकर , श्री बिसेन , गंगाधरजी फलके श्री . संजयजी मोहोड श्री . विकासजी खवाससंचालक वर्ग : सर्वश्री शिवजी पटेल , नरेद्र गारघाटे , हिरामण नागपुरे , जगदीश राहाटे , आनंद गुप्ता , अशोक शिशीकर , संजय धनविजय , अशोक देशमुख , ऑड भैय्याजी पोंगडे , लोकेश झोडे , संचालिका सो . उषाताई मोहोड , सौ . सुरेखाताई रेवतकर इत्यादी उपस्थित होते .