ताज्या घडामोडी

दादासाहेब टेंगसे यांनी बाधीत पिकांची केली पहाणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

तालूक्यात सर्वदुर झालेल्या धुवाँदार पावसाने हा हा कार माजवत चारही महसुल मंडळा अतिवृष्टी झाल्याने शेतातील उभी पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्याचा तोंडचा घास हिरावला गेला आहे.आशा तालुक्यातील देवेगाव, सिमुरगव्हाण, बोरगव्हाण शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या बाधीत पिकांची पाहणी शुक्रवार १० सप्टेबर रोजी माजी सभापती दादासाहेब टेंगसे यांनी केली. अनेक शेतात पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने दादासाहेब टेंगसे यांनी तात्काळ जायकवाडी पाटबंधारे विभागास फोन लाऊन पाणी मार्गस्त करण्याच्या सुचना दिल्या असता पाटबंधारे विभागाने तात्काळ दखल घेत शेताबाहेर पाणी काढण्यासाठी जेसीबी मशीन पाठवुन पाणी शेताबाहेर काढण्याचे काम सुरू केल्याने मागील वर्षापासुन प्रलंबीत प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यामधून समाधान व्यक्त होत आहे.
पाथरी तालूक्यात ३० ऑगष्ट पासुन सर्व दुर हजेरी लावली त्यानंतर सुरु झालेल्या पावसाने ५ सप्टेबर पासून या पावसाने रौद्ररूप धारण केले. ७ सप्टेबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाची महसुल प्रशासनात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे तालूक्यातील सर्व भागातील पिके पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे.तर अनेक भागात शेताला तळ्याचे स्वरुप आले आहे. अशीच परिस्थिती तालूक्यातील देवेगाव शेत शिवारात उदभवली आहे. सदरील परिस्थिती येथील शेतकऱ्यांनी दादासाहेब टेंगसे यांना कळविल्याने त्यांनी शुक्रवार १० सप्टेबर रोजी देवगाव येथे भेट देऊन येथील शेख खाजा शेख बुऱ्हाण ,रामलिंगअप्पा बीडकर, महेश बीडकर, गणेश बीडकर या शेतकऱ्यांच्या शेतातील बाधीत पिकांची पाहणी केली. तसेच गावातील दलीत वस्तीस भेट देऊन या भागातील ग्रामस्थ दगडू ढगे, सिद्धार्थ दगडू ढगे, अशोक दगडू ढगे, नारायण आव्हाड, जितेंद्र हातागळे, शिवाजी आव्हाड यांच्या घरात अतिवृष्टीचे पावसाचे पाणी घुसुन झालेल्या नुकसान परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर सिमुरगव्हाण शेत शिवारास भेट देऊन राजाभाऊ नाईकल, सुनिल नाईकल, सुनिता नाईकल यांच्या सह गाव परिसरातील नुकसान झालेल्या पिक परिस्थितीची पाहणी केली. तसेच बोरगव्हाण शेत शिवारात भेट देऊन ओढया काठावरील गंगाधर भाऊराव इंगळे, वैजनाथ लक्ष्मणराव इंगळे माऊली इंगळे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
जायकवाडी विभागाने घेतली तात्काळ दखल
शुक्रवार १० सप्टेबर रोजी दादासाहेब टेंगसे यांनी देवगाव येथे भेट देऊन सदरील बाधीत शेताची पाहणी केली व जायकवाडी विभागास फोन करून शेतात साचलेले पाणी मार्गस्त करण्याच्या सुचना देताच जायकवाडी विभागाचे कर्मचारी देवेगाव येथे हजर झाले. व जेसीबी मशीन द्वारे सदरील शेतातील पाणी मार्गस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा करूनही न झालेले काम दादासाहेब टेंगसे यांच्या पुढाकाराने सुरु झाल्याने या भागातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी दादासाहेब टेंगसे यांच्या सोबत माजी जि.प. सदस्य चक्रधर उगले, सपोर्ट फाऊंडेशनचे सदाशिव थोरात,गावचे सरपंच पप्पू गलबे, बाजार समिती संचालक राजेश्वर गलबे, ज्ञानेश्वर गलबे, काशीनाथ गलबे,सिमुरगव्हाण चे उपसरपंच सुनिल नायकल व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे केले मन परिवर्तन
उभी पिके पाण्याखाली गेल्याने चिंताग्रस्थ शेतकरी शेख खाजा शेख बुऱ्हाण यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला होता.या शेतकऱ्याची शेतावर जाऊन दादासाहेब टेंगसे यांनी भेट घेतली. व त्यास आधार देत त्याचे मन परिवर्तन केले.आत्महत्या सारखे नकारात्मक विचार डोक्यात आणून कुटूंबाला वाऱ्यावर सोडू नका जीवनात असे संकटे येत राहतात त्यास धाडसाने सामोरे जात आपल्या कुटूंबाला आधार देण्याचे काम करा म्हणत शेतकऱ्यास धीर दिला.व अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दादासाहेब टेंगसे यांनी आश्वासित केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close