ताज्या घडामोडी

अधिशवरी बनली आरोग्य अधिकारी


शेतकऱ्यांच्या मुलीने हलाखीच्या परिस्थिती वर मात करून रोवला मानाचा तुरा

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे

चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या सिरपूर येथील अधिस्वरी जगदीश बोरकर या युवतीने आरोग्य विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश प्राप्त करीत कुटूंबाचा आणि गावाचा नावलौकिक वाढवीत हलाखीच्या परिस्थिती वर मात करीत कठीण परिश्रम च्या जोरावर मानाचा तुरा रोवला नुकतीच अधिश्वरी ची आरोग्य अधिकारी म्हणून नागभीड तालुक्यातील वाढोना प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती झाली आहे
सिरपूर या छोट्या गावात अधिश्वरी चा जन्म शेतकरी कुटुंबात झाला कुटूंबाची परिस्थिती हलाखी ची होती याही परिस्थितीत शिक्षण घेणे हे अधिश्वरी साठी फार कठीण होते कसे तरी परिश्रम करून पालकाने तिला शिक्षण दिली अधिश्वरी च्या जिद्द व चिकाटी अफाट परिश्रम च्या जोरावर तिने हे यश प्राप्त करीत ग्रामीण भागातील होतकरू युवक युवती समोर आदर्श निर्माण केला आहे
गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण करीत पदवी पर्यंत शिक्षण घेतले नंतर नर्सिंग चा अभ्याक्रम पूर्ण केला आणि आरोग्य विभागाची आरोग्य अधिकारी ही परीक्षा उत्तीर्ण करून यश प्राप्त करून पालकांचे व स्वतःचे स्वप्न पूर्ण केले अधिश्वरीला गोर गरीब जनते ची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि त्यात आरोग्य अधिकारी बनून जनतेचीसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण केले तिच्या या यशाबद्दल आई वडील पालक गुरुजन आणि सिरपूर वासीय गावकर्यांनी अभिनंदन केले आणि पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा चा वर्षाव केला

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close