ताज्या घडामोडी

परभणी जिल्ह्याचा दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करा यासह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचा मानवत मध्ये रस्ता रोको

रस्ता रोकोला भाजपा वगळता सर्वपक्षीय पाठिंबा.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी  

परभणी जिल्ह्याचा दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मानवत तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने सोमवार १९ सप्टेंबर रोजी शहरातील महाराणा प्रताप चौकात दुपारी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रस्ता रोको आंदोलनाला भाजपा वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला या रास्ता रोको मुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती
परभणी जिल्ह्यातील पीक पेरणी साधारणतः १० जून पर्यंत झाली होती परंतु सुरुवातीलाच पाऊस सतत धार पडत राहिल्यामुळे पिकाची वाढ खुंटली त्यानंतर ऑगस्टमध्ये सलग ३० दिवस पावसाचा खंड पडला असल्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे त्यामुळे शासनाने परभणी जिल्ह्याचा दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करून मानवत तालुक्यातील सर्व मंडळाचा पिक विम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी त्याचबरोबर खरिपाचा पिक विमा सरसकट मंजूर करावा या मागण्यासाठी मानवत तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी ११ शहरातील महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको करण्यात आला या आंदोलनामुळे तब्बल एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी शेतकरी संघटनेची रामभाऊ शिंदे, कम्युनिस्ट पक्षाचे काँ.लिंबाजी कचरे पाटील, बाजार समितीचे संचालक तथा मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष माधव नाणेकर, बाबासाहेब आवचार, अँड.सुनिल जाधव,स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे हनुमान मसलकर, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोविंद घांडगे, किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव काळे यांनी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन केले या रस्ता रोको आंदोलनात बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष लाडाने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष दत्तराव शिंदे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख कृष्णा शिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष आंबेगावकर, खरेदी-विक्री संघाची चेअरमन अँड. संतोष लाडाने, आकाश चोखट, सुरज काकडे, हनुमान मस्के, अच्युतराव चाळक, बाळासाहेब काळे, अमोल कदम, नामदेव होगे, रामभाऊ मस्के, कारभारी मस्के, अरुणराव देशमुख, संजय टाक, मोहन महिपाल, दशरथ शिंदे, माणिकराव काळे, माऊली चांगभले, सुरेश होगे, दत्ता राऊत, माधव शिंदे, माऊली जाधव, आसाराम काळे, भगवान शिंदे, श्रीकांत देशमुख, राजेभाऊ होगे, भारत उकलकर, विठ्ठल काळे, नारायण अवचार, बळीराम रासवे, संजय देशमुख, माऊली शिंदे, अरुण शिंदे, प्रताप पिंपळे, शुभम काळे, रुस्तुम मांडे, गणेश घांडगे,गोपाळ पिंपळे, सुदाम मस्के, गजानन होगे,धनंजय काळे, बालाजी टाक, रामप्रसाद काळे, रामराव साठे, बालाजी चव्हाण, सोपान सुरवसे, तुकाराम चव्हाण, आसाराम काकडे, मारोतराव देशमुख, ज्ञानेश्वर निर्वळ, मदन रासवे, भगवान होगे,हनुमान होगे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी रस्ता रोको आंदोलनात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पो.नि.प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंद बनसोडे पोउनि रमेश गिरी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला तर या आंदोलकांचे नायब तहसीलदार नकुल वाघूंडे यांनी घटनास्थळी येऊन विविध मागण्याचे निवेदन स्विकारले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close