ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप मध्ये नागपुर च्या मुलांचे सुयश
मुख्य संपादक: कु.समिधा भैसारे
नुकत्याच जळगाव येथे झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियनशिप मध्ये नागपुर च्या सहा कराटे पटुनी भाग घेऊन यश संपादन केले .
वॉरियर्स शोतोकान कराटे असोसिएशन , स्कूल गेम्स स्पोर्ट्स कराटे असोसिएशन व नेहरू युवा केंद्र जळगाव याच्या वतीने सेंसाई निलेश सोनवणे यांनी स्पर्धेचे आयोजन केले स्पर्धेत वेगवेगळ्या राज्यातून खेडाळुनी भाग घेतला होता यामध्ये नागपुर च्या सेंसाई तेजस्वी झाडे यांच्या सहा विद्यार्थांनी भाग घेतला त्यामध्ये 6 ते 8 वर्षे गटात कुमीते या प्रकारात कुंज बावणे नी रजत पदक , 10 ते 12 वर्षे गटात करुण्या थुल ने कुमिते मध्ये सुवर्ण व काता प्रकारात रजत , 12 ते 14 वजन गटात तन्मय हरणे ने दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक 14 ते 16 वर्षे गटात श्रृष्टी जांभुळे कुमीते प्रकारात सुवर्ण तर काता मध्ये रजत पदक व वैभव तागडे काता प्रकारात काश्य पदक 16 ते 18 वर्षे गटात जॉसोन स्टॅनिस्लस ने कुमीते प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त करूण यश संपादन केले सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय शिहान शाम भोवते , सेंसाई तेजस्वी झाडे व आपल्या आई वडिलांना दिले . त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .