अजितदादांनी प्रकाशदादांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे:नुमान चाऊस
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी आज पर्यंत केलेल्या कामगिरी व सामाजिक कामांमुळे मतदारसंघातील जनतेने प्रकाश दादा सोळंके यांना पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून दिला आहे.
राजकीय वातावरण गढूळ झालेला असतानाही मा. प्रकाश सोळंके हे नेहमी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालत राहीले. एक दशकापूर्वी मंत्रीपद असताना आमदार सोळंके यांनी माजलगाव तालुक्यात एमआयडीसी आणली तसेच ढालेगाव शेजारी पाटबंधारा उभारला. टेक्स्टाईल पार्क सारखे उद्योग आणले, ज्याने शेकडो तरुण-तरुणींना रोजगार मिळाला तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी माजलगावात वेगवेगळे व आधुनिक शिक्षणाचे महाविद्यालय सुरळीत चालवले. याच मंडळाच्या माध्यमातून औरंगाबाद, नांदेड सारख्या ठिकाणी मिळणारे शिक्षण त्यांनी माजलगावच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. माजी मुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांच्या काळात बांधण्यात आलेल्या माजलगाव धरनामुळे हजारो लोकांचा मासेमारी, शेती व इतर माध्यमातून पोट भरत आहे. हाच वारसा आमदार प्रकाश दादा पुढे घेत राहतील. हा सगळा अनुभव लक्षात घेता तसेच पुढील काळात मतदारसंघाचा आणखीन विकास व्हावा, उद्योग पर्यटन व इतर विकासकामे यावे यासाठी आमदार प्रकाश दादा सोळंके यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद शीघ्र बहाल करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी महायुतीचे नेते तथा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्याकडे केली आहे.