ताज्या घडामोडी

वाळू भरलेल्या ट्रॅक्टर ट्रालीवरुन खाली पडल्याने युवकाचा मृत्यू

शिवणपायली – चिखली रस्त्यावरील घटना.

ट्रॅक्टर मालकास वाचवण्यासाठी धडपड.

प्रतिनिधी:यशवंत कुंदोजवार

शिवणपायली येथील ट्रॅक्टर मालक सुमीत पालकदास बोरकर यांच्या ट्रॅक्टरवर वाळू भरून दुलाई करीता कुमार लखन अंबादास पोईनकर जायचा.
आज पहाटे सुध्दा तो शिवणपायली येथील सदर टाॅक्टर मालक सुमीत बोरकर यांच्या ट्रॅक्टरवर वाळू भरण्यासाठी व सदर ट्रॅक्टरटाली द्वारे वाळू दुलाई करण्यासाठी रोजंदारीने गेला होता.
चिमूर तालुक्यातील मौजा नेरी मार्गाने वाळू भरलेला ट्रॅक्टर धावत असताना सदर ट्रॅक्टर टालीवरुन शिवणपायली ते चिखली रस्त्यावर पडल्याने कुमार लखन अंबादास पोईनकर वय १९ वर्ष हा ट्रालीच्या मागच्या बाजूच्या चक्क्यात दबला.
ट्रालीच्या मागच्या चक्क्यात लखन दबल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
लखन याचा मोठा भाऊ देवानंद अंबादास पोईनकर हा उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे अपघातग्रस्त लहान भावास पाहण्यासाठी गेला असता कुमार लखन चा मृत्यू झाला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
यानंतर त्यांनी चिमूर पोलिस स्टेशनला घटनेबाबत तक्रार दाखल केली व सर्व हकीकत सांगितली.
ट्रॅक्टर टाली क्रमांक एम.एच.३४,सी.डी.९५६६,असून अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून ग्राहकांना वाळू विकणारे ट्रॅक्टर मालक सुमीत पालकदास बोरकर व ट्रॅक्टर चालक चंद्रशेखर नारायण तुमराम हे दोघेही रा.शिवणपायली,पो.नवतळा, तालूका चिमूर,जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांना अजून पर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.
ट्रॅक्टर चालक चंद्रशेखर नारायण तुमराम हा वाळू भरलेला ट्रॅक्टर वेगाने आणि अनियंत्रितपणे चालवत होता असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रार दिल्यानंतर तक्रारदारास तक्रारीची स्थळ प्रत देण्यात आली असून भांदवी कलम १०६/१,२८१,१८४ अंतर्गत पोलिस स्टेशन चिमूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, ट्रॅक्टर मालक सुमीत पालकदास बोरकर यांचे नाव गैर अर्जदार म्हणून तक्रारीत नमूद करुन घेण्यास पोलिसांनी नकार दिला असे देवानंद बोरकर यांचे म्हणने आहे हा मुद्दा तितकाच गंभीर आहे.
चंपलाल राजपूत पोलिस हवालदार बकलम नंबर २२१ चिमूर,यांनी घटनेची तक्रार दाखल करुन घेतली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close