ताज्या घडामोडी

रविवारी योगेश्वरी शुगर्सचा बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी:स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनासूत स्व आशोकसेठ सामत यांच्या नेतृत्वात २१ वर्षा पुर्वी गोदाकाठा तिरावर शेतकरी,कष्टकरी,कामगार यांचे जिवनमान उंचावे या साठी उभारला गेलेला लक्ष्मीनगर,लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स तालुक्याच्या दक्षिण भागा साठी वरदान ठरलेला आहे. या वर्षी २०२१-२२ च्या २० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदिपण सोहळा रविवारी सकाळी साडे नऊ च्या शुभ मुहुर्तावर संपन्न होणार असल्याची माहिती या साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख यांनी दिली.

गेली २० वर्षा पासुन कुठल्याही तक्रारी शिवाय शेतकरी,कामगार,कष्टकरी यांच्या हिताला प्राधान्य देत योगेश्वरी शुगर्स या खाजगी तत्वावरील साखर कारखाण्याची वाटचाल सुरू आहे.कधी कमी कधी अधिक उस उपलब्ध असला तरी या साखर कारखाण्याच्या व्यवस्थापणाने पुर्ण क्षमतेने आज पर्यंत अखंड पणे ऊसाचे गाळप केलेले आहे. साखर संचालकांच्या आदेशा नुसार वेळेत गाळपाला सुरूवात होणार असल्याने या वर्षी ललीता पंचमीच्या शुभमुहूर्तावर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता ह भ प यज्ञेश्वर रंगनाथ महाराज लिंबेकर यांच्या शुभ हस्ते तथा या साखर कारखाण्याचे जेष्ठ संचालक माजलगावचे माजी आ आर टी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत २० व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपण समारोह संपन्न होणार असल्याचे या साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख यांनी सांगितले. या वेळी सर्व संचालक,प्रवर्तक मंडळ सर्व विभागांचेअधिकारी ,कर्मचारी, कामगार उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमा साठी कोविड-१९ सर्व नियम पाळत ऊस उत्पादक,वातुक ठेकेदार,तोडणी कामगार आणि हितचिंतक यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन अॅड रोहीत आर देशमुख यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close