ताज्या घडामोडी

तथागत बुद्धाच्या स्त्री स्वतंत्रयाचे खरे उपासक म्हणजे संत गाडगेबाबा होय -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

संत गाडगेबाबा हे स्वच्छता चे जनक तर होतेच पण भविष्याचा वेध घेण्याची विशाल दृष्टी त्यांची होती व्यशनमुक्ती कटुंब नियोजन आर्थिक नियोजन रूढी परंपरा ने खचला गेलेला माणूस ताठ मानेने उभा राहावा यासाठी प्रभोधनाच्या नांगराने माणसाच्या मनाची मशागत गाडगेबाबा करत होते आपल्या कीर्तनामधून ज्या अनेक शोषनामणध्ये स्त्री अडकली आहे त्या शोषणाचे दरवाजे किलकिल केलेत भारतीय स्त्री मानसिक गुलामीचा बळी ठरू नये यासाठी त्यांनी अत्यंत पोटतीकडीने विचार मांडले ग्रामीण भागातील स्त्रीच्या मेंदूतील अंधश्रद्धा चा पसारा काढून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला धर्मशास्त्र स्त्रीचें संपूर्ण स्वतंत्र नाकारते तर दुसरीकडे संत गाडगेबाबा धर्मशास्त्रतील या पाखंडालाच सुरुंग लावतात संत गाडगेबाबानि महिलांच्या सांस्कृतिक प्रतिभेला न्याय दिला होता संत मीराबाई शिरकर तर संत गयाबाई मनमाडकर या दोन महिलांना कीर्तनकार म्हणून समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती ही घटना अत्यंत क्रांतिकारी आहे तथागताच्या धम्मात भिकूनीचा संघ होता म्हणून मी इथल्या पाखंडी धर्मव्यवस्थेला नाकारत आहे व या स्त्रीया कीर्तनाच्या माध्यमातून स्त्री स्वतंत्रचा नवा विचार समाजाला देत आहे असे संत गाडगेबाबा म्हणत म्हणून संत गाडगेबाबा हे तथागत बुद्धाच्या स्त्री स्वतंत्र चे खरे उपासक होय असे ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी महिला बालकल्याण व बार्टी च्या संयुक्त विद्यमानाणे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी सोनेगाव बेगडे येथील कार्यक्रमात आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष अंगणवाडी सेविका संगीता वाघमारे शुभांगी गजभे मंदा बुधे ह्या उपस्थित होत्या पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की संत गाडगेबाबा यांनी मृत्यूनंतर चे कर्मकांड आपल्या मुलांचे शिक्षण हुंडाबळी या सर्व विविध प्रश्नां वर प्रबोधन केले समाज एका समान पातळीवर यावा यासाठी कोणी गरीब कोणी श्रीमंत कुणी ज्ञानी कुणी अडाणी नसावे सर्वांचे रक्त एकच आहे मग जातीभेद का करयेचा असे प्रश्न विचारत स्वतः हातात झाडू घेऊन गाव झाडत होते व लोकांची मानसिकता आपल्या शब्दांनी बदलवून टाकत विचारांची उंच झेप त्यांनी घेतली होती तेव्हा संत गाडगेबाबा यांचे विचार हे माझे शोषण होऊ नये अशा आशावाद घेऊन जगणारा समाज निर्माण व्हावा अशा आहे तेव्हा त्यांच्या विचारांची आपल्या जीवनात सर्व समाजांनी कृतीत उतरवले पाहिजे दारू पिणाऱ्या नवऱ्याची सेवा करू नका हम दो हमारे दो हा नारा पुढे चालवून भोदूबाबा च्या मागे लागू नका असे सविस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले यावेळी परिसरातील स्वच्छता करण्यात आली या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बारुताई ननावरे यांनी केले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close