ताज्या घडामोडी

जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश देवकतेंच्या हस्ते विविध कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

शेणगांव व हिरापूर येथील कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्याच्या अगदी टोकावर व तेलंगणा राज्याच्या सिमेवर असलेल्या अतिदुर्गम जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत, शेणगाव अंतर्गत येत असलेल्या शेणगाव व हिरापूर (ताडी) येथील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात; यासाठी स्वच्छ भारत मिशन योजना अंतर्गत बस स्टाॅप, शेणगाव येथे व शेणगाव येथील घनपठार फाटा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या 10 लाख रुपयें किंमतीच्या सार्वजनिक शौचालयांच्या दोन इमारतीचे या शिवाय 15 वा वित्त आयोग (ग्रा.पं.स्तर) निधीतून शेणगाव येथील साविञीबाई फुले नगर मध्ये नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सौर उर्जेवर आधारित पाणी पुरवठा करणे, सदरहु पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण व जनसुविधा योजनेतंर्गत हिरापूर (ताडी) येथील मंजूर कामाचे भूमीपूजन जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश देवकते यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या लोकार्पण व भूमीपूजन सोहळ्याला जेष्ठ नेते तथा जिवती तालुक्याचे भा.ज.पा. अध्यक्ष केशव गिरमाजी, शेणगांव सरपंच मारुबाई राजु सिडाम, , उपसरपंच नरेश कोंडीबा हामने, ग्राम विकास अधिकारी मोहन रामकृष्ण जोगी, ग्राम पंचायत सदस्य नंदा बब्रुवान मुसणे, ज्योतीका संदीप कांबळे, . चंद्रभागा दिगंबर पोले, कु. दुर्गा लेतु कोडापे, रेणुका रामदास नंदेवाड, तानुबाई बारिकराव आत्राम, राजु भिमू सिडाम, कर्णू भीमराव कुळमेथे, बालाजी मस्नाजी तोगरे, अजय किसनराव तिरणकर, तसेच नामदेव सलगर, संजय पवार, शेख जहागीरदार, आरिफ शेख, लाला शेख, अजय खंदारे, बालाजी बिरादार, तुलसीदास गायकवाड तसेच ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close