ताज्या घडामोडी

आदर्श ग्राम असलेला राजगड ने पुन्हा नवा आदर्श निर्माण केला

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या विषाणूची लागण लहान बालकापासून ते वयोवृद्ध होताना दिसत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जनता चांगलीच धास्तावली आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. त्यातच मुल तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या राजगड ने पुन्हा नवा आदर्श निर्माण केला आहे. राजगड येथील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाली आहे. गावातील 45 वर्षावरील सर्व 562 जणांना कोवीड लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. आदर्श ग्राम म्हणून राजगड महाराष्ट्र मध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. कोरोणाच्या प्रादुर्भाव रोकण्यासाठी या गावाने प्रशासनाच्या मदतीने विशेष प्रयत्न केले. लसीकरणासाठी सक्रिय सहभाग दर्शवला. या गावात 45 वर्षावरील 562 नागरिक आहे या नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा पहिला डोज घेतला आहे. त्यामुळे 45 वर्षावरील लसीकरण पूर्ण करणारे राजगड हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. राजगड या गावाचे जिल्हात सर्वत्र कौतुक होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close