क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त फराळाचे आणि अन्यधान्य किट वाटप
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दि 03 जानेवारी 2022 वार सोमवार रोजी 03 वाजता पोलीस मित्र परिवार समितीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून गरीब आणि निराधार आजीला आशाबाई यांना फराळाचे आणि अन्यधान्य किट वाटप करण्यात आले पत्रकार , समाज सेवक आणि पोलीस मित्र परिवार समितीचे परभणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश जोशी पाथरी नेहमीच समाज कार्य करीत असतात अंध अपंग , गरीब, निराधार लोकांना ते नेहमीच मदत करतात समाज सेवा करणे त्यांचा आवडता छंद आहे सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात समाजाला , निराधार , गरीबांना काहीतरी सतत देण्यासाठी त्यांना खूप आवडते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन ते समाज सेवा करतात पाथरीचे महान समाज सेवक आणि आदर्श पत्रकार अहमद अन्सारी साहेब हे पत्रकार महेश जोशी यांना खूप मदत करतात कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पाथरीचे आदर्श समाज सेवक अहमह अन्सारी यांनी खूप मदत केली .