ताज्या घडामोडी

घरकुल लाभधारकांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडणार- सखाराम बोबडे पडेगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी


गंगाखेड नगरपालिकेच्या हद्दीतील घरकुल आवास योजनेच्या लाभ धारकाचे थकलेले हप्ते, वाळूचा तुटवडा, अधिकार्‍याकडून पिळवणूक या समस्या जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी मांडणार असल्याची माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बुधवारी उपोषण कर्र्त्या समोर बोलताना दिली.
गंगाखेड नगरपालिका अंतर्गत 560 घरकुलाचे काम सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार लाभधारकांनी काम सुरू केले असले तरी नगरपालिका कडून मिळणारे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने लाभधारक अडचणी आले आले आहेत. बरेच लाभधारकांनी मित्रा, नातेवाईक कडून पैसे व्याजाने घेऊन आपल्या घरकुलाची काम पूर्ण केले. आपल्या घरकुलाचे काम पूर्ण केले असले तरी त्यांना आजपर्यंत दुसरा अथवा तिसरा हप्ता ही मिळालेला नाही. त्याचबरोबर विकास निधीच्या नावाखाली प्रत्येकाकडून दहा हजार रुपये घेतले जात असल्याच्या कारणावरून घरकुल लाभधारकांनी नगरपालिका सामोरं बुधवारी उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. आणि या समस्या लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन प्रत्यक्ष लेखी स्वरूपात कळविण्यात येतील असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. नगरपालिकेचे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपोषण सोडवीण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. यावेळी ह भ प शिवाजी महाराज बोबडे, राहुल साबने यांच्यासह ईरिश्तेहाक इस्माईल, आत्माराम पावडे, गणेश भूसनर, उपोषणकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close