शेतक-यांचे पिककर्ज त्वरीत निकाली काढा-माजी आ लहाने
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शेतकरी आस्मानी संकटात सतत त्रस्त आहेत. खत,फवारणी सहशेत मशागती साठी त्यांना पैशाची आवशकता आहे त्या मुळे शेतक-यांना त्वरीत पिककर्जाचे वाटप करा अशी मागणी पाथरी विधानसभा मतदार संघाचे माजी आ.हरीभाऊ लहाणे यांनी शुक्रवार ६ ऑगष्ट रोजी येथील स्टेट बँक ऑफ इंडीयाचे व्यवस्थापक कैलास रणदिवे यांच्या कडे केली.
या वेळी माजी आ लहाने यांनी किती शेतक-यांनी कर्जा साठी फाईली दिल्या किती शेतक-यांच्या फाईल मंजूर करून पैसे दिले याची विचारणा बँक व्यवस्थापक रणदिवे यांना केली. या वेळी रणदिवे म्हणाले की,आम्हाला तलाठ्या मार्फत साडे पाच हजार फाईल्स प्राप्त झाल्या आहेत.यातिल दोन हजार फाईल्स ची छाननी झाली असून यात थकीत कर्ज असलेल्या शेतक-यांच्या फाईल्स मुळे जास्त वेळ जात आहे.ज्या शेतक-यांनी थकीत कर्ज भरणा केलेला आहे. त्यांना पिका नुसार कर्ज देण्याची कार्यवाही सुरू आहे. वेळ लागतोय तो थकीत कर्ज दारांनी फाईल्स देण्या मुळे.प्रत्येक फाइल्स ची तपासणी करूनच पुढिल कर्ज देता येते. या साठी मी विविध कर्मचा-यांची नियुक्ती केलेली असुन लवकरात लवकर सर्वांना नक्कीच कर्जाचे वाटप केले जाईल.