ताज्या घडामोडी

ब्रह्मा कुमारी मीरा दीदी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मा. जिजाऊ फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण महासोहळा 2022 शिरपूर जिल्हा वाशिम यांच्या वतीने आज दिनांक २३ मार्च २०२२ वार बुधवार सहिद दीन व आशा दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय सोनपेठ याठिकाणी आदरणीय, ब्रह्मा कुमारी मीरा दीदी देविदास वाडकर (प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी य िश्‍वविद्यालय शाखा सोनपेठ संचालिका तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था सोनपेठ तालुका महिला अध्यक्ष ) यांना मा. श्रीमती .निर्मलाताई विटेकर जिल्हाध्यक्ष परभणी यांच्या हस्ते व डॉ. सुभाष पवार T H O सोनपेठ डॉ. सिद्धेश्वर हलगे डॉ. महाजन तसेच इतर सर्व डॉक्टर्स नर्सेस व सोनपेठ तालुक्यातील सर्व आशा कर्मचारी महिला यांच्या उपस्थितीत, समाज रत्न 2022 पुरस्कार प्राप्त झाला तसेच . मागील 20 वर्ष पासून अनेक समाज उपयोगी उदा – महिला सशक्तिकरण, शाश्वत जैविक शेती, तणावमुक्त जीवन, सकारात्मक चिंतन, नैतिक मूल्य ,व्यसन मुक्ती ,राष्ट्रभक्ती, देशभक्ती, महिला शक्ती, अशा विविध विषयावर आज पर्यंत दोन हजार पेक्षा जास्त व्याख्याने दिली असून उल्लेखनय वाखण्या जोगे कार्य केल्या बद्दल ,निसर्ग मित्र ,ग्लोबल इंडिया स्टार अवार्ड कोविड योद्धा अशा विविध पुरस्कार नी मीरा दीदी यांना अशा अनेक समाज सेवी संस्थानच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले आहे . तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या ब्रह्मा कुमारी मीरा दीदी यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सर्वांना आपल्या गोड वाणीतून मंत्रमुग्ध केले व तणावमुक्त जीवन सकारात्मक चिंतन याविषयी यथार्थ मार्गदर्शन करून शेवटी बोलताना एवढेच सांगितले की हा राज्यस्तरीय पुरस्कार केवळ माझा एकटीचा नसून सर्व सोनपेठ वासियांचा सोनपेठ तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे अभिमान आहे असे अनेक कार्य आपल्या हातून आपल्या सर्वांचे सहकार्यातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेन तसेच अनेक ठिकाणाहून आपल्या सर्वांकडून कौतुकाचे बोल अभिवादन सत्कार-सन्मान मिळत असल्यामुळे पुढील कार्यकाळात अजून चांगल्या प्रकारे तळागाळातील सर्व नागरिकापर्यंत पोहोचून ज्ञानदानाचे वैचारिक बदल घडवून आणून माणसातील माणुसकी जिवंत ठेवण्याचे कार्य अहोरात्र करत राहील असे आपले मत शेवटी बोलताना मीरा दीदी यांनी व्यक्त केले तसेच डॉ. सुभाष पवार डॉ. सिद्धेश्वर हलगे यांनीही आपले विचार मांडले व अध्यक्षीय समारोप करत असताना श्रीमती .निर्मला ताई विटेकर यांनी आशा वर्कर यांचे कौतुक करून असेच नेहमी अभिमानास्पद कार्य करून दाखवा असे मत व्यक्त केले व आपल्या सर्वांच्या कोणत्याही अडीअडचणी आल्या तर प्रत्यक्ष भेटून फोन कॉन्टॅक्ट वर आपण माझ्याशी संपर्क करून आपल्या अडचणी दोन दूर करून घ्याव्यात अशी ग्वाही दिली. कार्यक्रमासाठी उपस्थित आशा कर्मचारी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स यांना महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्री राजेश टोपे जी यांच्या वतीने प्राप्त झालेले कोविंड योद्धा प्रमाणपत्र वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन हे डॉक्टर स्वप्निल जोशी यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close