सावरी येथे ग्राम संघाचे खाते नियमित सुरू करण्यासंदर्भात चर्चा
प्रतिनिधी: हेमंत बोरकर
दिनांक 25 नोव्हेंबर 2021 ला मौजा सावरी(बीड.) येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावरी येथे व्यवस्थापक यांच्यासोबत सावरी येथील ग्राम संघाचे खाते नियमित सुरू करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली व ग्राम संघाचे खाते सुरु करण्यात आले.
4.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय सावरी येथे covid-19 लसीकरण कार्यक्रम अंतर्गत ज्या महिलांनी अद्यापही एकही लस घेतली नाही अशा महिलांची मीटिंग बोलून त्यांना लसीकरण संदर्भात श्री. राजेश बारसागडे (तालुका अभियान व्यवस्थापक), तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर यांनी लसीकरण संदर्भात जाणीव-जागृती पर मार्गदर्शन करण्यात आले तसेच श्री. मेघदिप ब्रम्हणे तालुका व्यवस्थापक (आर्थिक समावेशन) यांनी गावातील एकही व्यक्ती लसीकरण न घेता राहू नये यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर ग्रामसेवक श्री. नगराळे सर ग्रामपंचायत कार्यालय सावरी ग्रामपंचायत सदस्य श्री. रवि रामटेके ग्रामपंचायत शिपाई श्री. रामटेके सी.आर.पी. सौ. अतिता खोब्रागडे कृषी सखी सौ. निखाडे व गावातील महिला पुरुष उपस्थित होते.