श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरी येथे मोफत रक्तदान शिबीर संपन्न

प्रतिनिधीः रामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील नेरी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरीच्या वतीने मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी महोत्सवा प्रित्यर्थ संगीतमय ग्रामगीता तत्त्वज्ञान प्रसार व प्रचार सप्ताह निमित्य,

आज दि. 12/डिसेंबर/ 2024 ला घटस्थापना सकाळी 9 वाजता डॉ.श्यामजी हटवादे यांचे शुभहस्ते करण्यात आली.तसेच सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर डॉ.हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांच्या सौजन्याने व गुरुदेव सेवा मंडळ नेरी ,डॉक्टर असोसिएशन नेरी , नेरी शहर व्यापारी असोसिएशन यांच्या सहकार्याने देण्यात आला. सदर शिबिरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच
13/12/2024 रोज शुक्रवारला, श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरी येथे सकाळी 10 वाजता
मोफत रक्त तपासणी शिबीर
प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी
HLL महाल्याब अंतर्गत
सर्व प्रकारच्या रक्तचाचण्या (CBC, TFT, lipid profile,LFT,KFT, Torch, Prolactin व इतर टेस्ट मोफत करण्यात येईल
वय मर्यादा 18 ते 45 वर्ष
Special Test वय 45 ते 70 CBC,HB1AC,KFT (सोबत येतांना मोबाईल नंबर घेऊन येणे)
तसेच प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल नागपूर तर्फ हृदयरोग व मधुमेह तपासणी शिबीर आयोजित केला आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान गुरुदेव सेवा मंडळ मेरी च्या वतीने करण्यात आले.