राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव महाराज गोगलगावकर यांचा रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने सत्कार सन्मान
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रतिनिधी रुग्ण हक्क संरक्षण समितीचा संविधान गौरव पुरस्कार सत्कार समारंभ सोहळा 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात सामाजिक, सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेवून साजरा करण्यात येत आहे, त्या निमित्त परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्रच्या वतीने ही शहरातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कारामध्ये विशेष सत्कार परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय गौसेवक वारकरीसेवक नितीन जाधव महाराज गोगलगावकर यांचा सामाजिक अध्यात्मिक धार्मिक गोरक्षण गो रक्षक गोपालन गोसेवकांसाठी कार्य करणारे तसेच मतदानाचा टक्केवारी वाढावा यासाठी विविध ठिकाणी जनजागृती अभियान उपक्रम राबवणारे तसेच नव्याने नियुक्त तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त श्री क्षेत्र खंडोबा मंदिर मल्हार गड संस्थान देवगाव फाटा ट्रस्टचे वार्षिक सभासद पदी निवडी झाल्याबद्दल विविध कार्याबद्दल सत्कार व स्वागत करण्यात आला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजी. आर.डी. मगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्तार इनामदार, ऍड. निलेश करमुडी, शिवाजी चव्हाण, रेणुका बोरा, खदीरलाला हाश्मी, प्रमोद कुटे, आदिंची उपस्थिती होती. महाराष्ट्रभरात सामाजिक, शैक्षिणक, सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 40 महिला व पुरुषांचा संविधान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आज संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले होते. तर सूत्रसंचलन प्रा. राजकुमार मनवर यांनी तर आभार प्रदर्शन शेख सरफराज यांनी केले.