मान.खासदार अशोकजी नेते, व आमदार कीर्तिकुमार ऊर्फ (बंटीभाऊ) भांगडिया यांच्या शुभहस्ते चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
हजारे पेट्रोल पंप चौक जवळील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारकाचे होणार सौंदर्यीकरण
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चिमुर :खासदार अशोकजी नेते यांच्या विशेष प्रयत्नाने व आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंंटीभाऊ भांगडिया यांच्या पुढाकाराने या वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा जगन्नाथ बाबा कॉलोनी येथील विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज मंदिर परिसरात पार पडला.खासदार अशोकजी नेते व आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते एकूण ८० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन स्थळी कुदळ मारून व फलकाचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला.
चिमूर येथे भूमिपूजन सोहळा आज अनंत चतुर्दशी निमित्त होत आहे हि आनंददायी बाब आहे. गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन नागरिकांना सुख समृद्ध आरोग्यदायी जीवन जावो अशी प्रार्थना या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केली.
खालील कामाचे भूमिपूजन खासदार अशोक नेते व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या शुभहस्ते सोहळा फित व रिबीन कापत कुदळ मारुन संपन्न झाला.
● चिमूर येथे बालु पिसे ते नारायण हजारे ते अशोक पिसे यांच्या घरापर्यंत सि.सि. रोड व नालीवर कव्हर बांधकाम करणे. (कामाची किंमत: १० लक्ष रुपये)
● चिमूर येथे बालु पिसे ते श्री जगन्नाथ महाराज मंदिर एक साईड सिमेंट काँक्रीट कव्हर नाली बांधकाम करणे. (कामाची किंमत: १० लक्ष रुपये)
● चिमूर येथे नरेश सारडा ते वाघमारे यांच्या घरापर्यंत एक साईड सिमेंट काँक्रीट कव्हर नाली बांधकाम करणे. (कामाची किंमत: १० लक्ष रुपये)
● चिमूर येथे सहारे ते नलोडे यांच्या घरापर्यंत एक साईड सिमेंट काँक्रीट कव्हर नाली बांधकाम करणे. (कामाची किंमत: १० लक्ष रुपये)
● चिमूर येथे सय्यद ते लोथे यांच्या घरापर्यंत दोन्ही साईड सिमेंट काँक्रीट कव्हर नाली बांधकाम करणे. (कामाची किंमत: १० लक्ष रुपये)
● चिमूर येथे हजारे पेट्रोल पंप चौक छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक यांचे सौंदर्यीकरण करणे. (कामाची किंमत: ३० लक्ष रुपये)
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक न.प. चिमूर डॉ. सुप्रिया राठोड मॅडम, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश वाकडे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजपा तालुका कोषाध्यक्ष रमेशजी कंचर्लावार, भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे, माजी सभापती/नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, माजी सभापती/नगरसेविका न.प. चिमूर छायाताई कंचर्लावार, माजी जि.प. सदस्या ममताताई डुकरे, भाजपा नेते ओमप्रकाश गणोरकर, भाजपा नेते योगेश नाकाडे, नलोडे जी, सचिन पिसे, प्रकाश असावा, अशोक पिसे व अन्य प्रशासकीय अधिकारी तसेच, भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.