माकोना ते सावरी मार्गाचे डांबरीकरण बांधकाम निकृष्ट दर्जाचे
माकोना ते सावरी डांबरीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रहार सेवक विनोद उमरे यांचा आरोप
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
चिमूर तालुक्यातील माकोना ते सावरी एक किमी अंतराचे डांबरीकरणं होत असून, सदर काम निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे, व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
माकोना ते सावरी मार्ग खड्डेमय असून, या मार्गाने अनेक नागरिक जखमी झाले होते. त्यामुळं माकोना ते सावरी या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी प्रहार सेवक यांनी निवेदन देऊन आंदोलन सुद्धा केले होते. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने दखल घेत माकोना ते सावरी या रोडचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केली. मात्र सदर चे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे प्रहार सेवक व अन्य नागरिकांच्या लक्षात आल्याने सदर कामाची तात्काळ योग्य ती चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी. व केलेल्या कारवाईची प्रतिलिपी पुरवण्यात यावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, जिल्हा परिषद बांधकाम सभापती राजू गायकवाड यांना प्रहार सेवक विनोद उमरे, मुरलीधर रामटेक, नारायण निखाडे, मिलिंद खोब्रागडे,सचिन घानोडे, लोकेश खामनकर, यांनी तक्रार केली आहे.