ताज्या घडामोडी

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील गुरुकुंज आश्रम मोझरी येथील सर्वधर्मीय प्रार्थना मंदिर पाडण्यास अनेक संघटनांचा तीव्र विरोध

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

गुरुकुंज आश्रम मोझरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं सर्वधर्मीय प्रार्थना मंदिर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाकडून पाडण्याच्या निर्णयाविरुद्ध दिनांक 10/10/2021 रोज रविवार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी पूर्वसंध्येला ला संपन्न झालेल्या प्रार्थना मंदिर बचाव समिती आयोजित वरखेड जिल्हा अमरावती येथील सभेत भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, जिल्हाप्रमुख सारंग दाभेकर यांचेसह सुधाकर पिसे सर नेरी, हरिश्चंद्र धोंगडे काग, कैलास भोयर सोनेगाव, कमलताई गुडधे सरडपार, विलास भोयर गजानन ठाकरे वाघेडा, गोरले बाम्हनी यासह निस्वार्थ कर्मयोगी गोरक्षक गवते महाराज नारायणपूर उपस्थित होते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्यांकरिता ग्रामगीते मध्ये मोलाचे मार्गदर्शन केले असल्यामुळे व ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केल्यामुळे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित राहून मोझरी येथील राष्ट्रसंतांचे सर्वधर्मीय प्रार्थना मंदिर पाडण्यास तीव्र विरोध दर्शवून प्रार्थना मंदिर बचाव समितीला पाठिंबा दिला. प्रार्थना मंदिरासह संपूर्ण गुरुकुंज आश्रम हे राष्ट्रीय स्मारक व्हावे व ते सुरक्षित जतन करून ठेवण्यात यावे असे मत सारंग दाभेकर यांनी सभेत व्यक्त केले. सभेला उपस्थित होण्या अगोदर मोझरी येथे प्रत्यक्ष प्रार्थना मंदिराची पाहणी केली असता प्रार्थना मंदिर आणखी पाचशे वर्ष टिकेल व त्याची योग्य काळजी घेतल्यास वर्षानुवर्षे प्रार्थना मंदिराला काहीच होणार नाही. प्रार्थना मंदिर जीर्ण झाले असे मध्यवर्ती कार्यालयाचे म्हणणे खोटे व गुरुदेव भक्ताची दिशाभूल करणारे असून त्यांनी मंदिर पाडण्याचा घेतलेला ठराव हाश्यास्पद आहे असे दाभेकर म्हणाले.प्रार्थना मंदिराला लागूनच हजार गुरुदेव भक्त एकाच वेळेस बसून सामुदायिक प्रार्थना करतील असे भव्य दिव्य नवीन प्रार्थना मंदिर मध्यवर्ती कार्यालयाने शासकीय निधीतून उभे केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रसंत निर्मित ऐतिहासिक सर्वधर्मीय प्रार्थना मंदिर पाडणाऱ्याचे घरे राहणार नाहीत असेही वक्तव्य संतापलेल्या काही गुरुदेव भक्तांनी बोलून दाखविले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close