मानवत येथे माखणी येथील पत्रकारावर झालेल्या हल्याचा निषेध
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने
माखणी येथील दै. सामना पत्रकार जनार्दन आवरंगड यांच्या वर दि.२३ ऑगस्ट रोजी माखणी येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध व हल्लेखोर यांना अटक करावी या मागणीसाठी निवेदन शुक्रवार दि.२६ रोजी तहसील कार्यालयात व पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांना देण्यात आले.
पत्रकार जनार्धन आवरगंड यांनी माखणी येथील सरपंच गोविंद आवरगंड यांना ओल्या दुष्काळा संदर्भात माहिती विचारले असताना सरपंच गोविंद आवरगंड व इतर गावगुंडांनी जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याचा निषेध म्हणून हल्लेखोरावर पत्रकार विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.
या निवेदनावर कचरुलाल बारहाते, श्याम झाडगावकर, सत्यशील धबडगे, डॉ. सचिन चिद्रवार, विलास बारहाते, प्रसाद जोशी, किसन बारहाते, कचरूलाल वर्मा, अलीम भाई, भैय्यासाहेब गायकवाड, अब्दुल हफीज बागवान, रमेश यादव, वसंत मांडे, रियाज शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.