भमिअभिलेख कार्यलयाचा भोंगळ कारभार
शेतकऱ्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिल्याने अधीकाऱ्यांचा सीमांकनास नकार
तब्बल 5 वेळा मोजणी होवूनही प्रत्येक मोजणीत फरक : ग्रामपंचायत चे आमदारांना साकाळे
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमूर तालुक्यातील नेरी येथील स्मशानभूमी मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असून या स्मशानभूमीच्या जागेची हद्द कायम व्हावी याकरिता तब्बल 5 वेळा मोजणी करण्यात आली मात्र प्रत्येक मोजणीत फरक येत असल्याने भमुअभिलेख कार्यालयाच्या कामावर संशय व्यक्त होत असून भूमिअभिलेख कार्यलयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की नेरी येथील स्मशानभूमीत अनेकांनी अतिक्रमण करून स्मशानभूमीची अर्ध्यापेक्षा जागा गिळंकृत केली त्यामुळे अंत्यविधी करीता जाणार नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत होता या बाबीची दखल घेत ग्रामपंचायत नेरी यांनी मोजणी करून जागा खुली करण्यासाठी मा. भूमिअभिलेख कार्यलयात पैसे भरून मोजणी केली मात्र प्रत्येक मोजणीच्या खुणा वेगवेगवेगळ्या येत असल्याने मोजणीवर संशय निर्माण होत आहे.
दि. 13.04.2021 रोजी ला स्मशानभूमी लागत असलेल्या कुरेशी यांनी मोजणी केली याकरिता भूमिअभिलेख कार्यालय चिमूर यांनी निलेश रायपूरे व सहकारी यांना पाठविले सुरुवातीस सदर स्मशानभूमीच्या जागेवर गाडलेले खांब योग्य असल्याचे त्यांनी सांगितले मात्र त्याचवेळेस शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टात जाण्याचा इशारा देताच अधिकाऱ्यांनी कुरेशी यांची जागा स्मशानभूमीकडे निघत असल्याचे सांगितल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केलेला असुन सदर स्मशानभूमीचे सीमांकान योग्य रित्या करून न्याय न दिल्यास गावकऱ्यांच्या वतीने संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांसह भूमिअभिलेख कार्यलयसमोर उपोषणाला बसणार असा इशारा दिला असून या गंभीर बाबीची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्यांना होणारा मानसिक त्रास बंद करण्यासाठी व 8.50 एकरचा सातबाऱ्याची जागा उपलब्ध करून देण्याकरिता आमदार साहेबाना निवेदन देण्यात आले आहे.
त्यामुळे अश्या बदलणाऱ्या मोजणीवर, मोजणी अधिकारी व मोजणी कार्यालयावर भरोसा कसा ठेवायचा कसा प्रश्न निर्माण होत असून या मोजणीच्या अनुषंगाने भमिअभिलेख कार्यलयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आलेला आहे.
—/////////——————–
सदर जागेच्या संदर्भात मी पहिल्यांदा पूर्वीची मोजणी बरोबर असल्याची माहिती दिली मात्र दक्षिण भागाकडे गेला असता मोजणी ची जागा बरोबर नसून फरक पडत असल्याचे मला आढळले. एक तर यापूर्वी झालेल्या मोजणीत चुका असतील किंवा मी केलेल्या मोजणीत चुका असतील त्यामुळे सदर मोजणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुन्हां करण्यात येईल. —- निलेश रायपूरे, भूकरमापक
सदर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी दिलेल्या धमकीला घाबरून सदर मोजणीचे सीमांकन केलेले नाही सदर मोजणी पूर्ण न केल्यास आम्ही सर्व भमुअभिलेख कार्यालया समोर उपोषण करू— चंद्रभान कामडी, उपसरपंच ग्रा.प. नेरी