ताज्या घडामोडी

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चिंतारेव,कुर्ता गांवात दौरा

गावाच्या निर्मितीनंतर गांवात येणारे पहिले जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार सोबत पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

इंद्रावती नदीच्या मधोमध वसलेला कुर्ता गांवात नावेने (डोंग्या )नी प्रवास करावे लागते..!!

ग्रामीण भागात दौरे करून समस्या जाणून घेणारे एकमात्र नेता..!!

गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतल..!!

अतिसंवेदनशिल व आदिवासी बहुल असलेल्या गावातील नागरिकांना सोईसुविधा उपलब्ध करून देऊन विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्याच दूरद्रुष्टी बाळगुन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार सम्पूर्ण जिल्हातील ग्रामीण भाग आजपावेतो लोकप्रतिनिधि व प्रशासन दुर्लक्ष करीत होता असे ग्रामीण परिसरात दस्तुरखुद त्याठिकाणी जावून समस्या जाणून घेत आहेत,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक ग्रामीण भागात दौरे करून समस्यांचे निराकरण करत आहेत.
महाराष्ट्र राज्य व छत्तीसगढ़ राज्य सीमेवरील गडचिरोली जिल्हातील शेवटचं टोकावर वसलेल्या अहेरी तालुक्यातील दामरंचा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या चिंतारेव गाव हा इंद्रावती नदीच्या काठावर वसलेले आहे.
तर कुर्ता हे गाव इंद्रावती नदीच्या मधोमध म्हणजे इंद्रावती नदीच्या पाण्याच्या प्रवाह सदर गावाजवळ दोन दिशांनी वाहत असुन मधोमध बेट निर्माण झाले असुन त्याठिकाणी कुर्ता गाव वसलेला असुन सहा कुटुंब पारंपरिक शेती करत उदरनिर्वाह करत असुन परिस्थिती मात्र जीवघेणा आहे.सदर गांवात ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी घेले जात नाहीत कारण पण तसेच आहे,सदर कुर्ता गांवात जाण्यासाठी नदीतून नाव (डोंग्या) नी प्रवास करून सदर गांवात जावे लागते.मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दामरंचा गावांच्या दौरात सदर गांवाबाबत दामरंचा येतील नागरिकांनी सांगितले व व्रूतपत्र,सोशल मीडिया वरून हि माहिती होती.त्यामुळे सदर कुर्ता गांवात भेट देवून समस्या जाणून घेतले आहे.अतिसंवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र मात्र स्वांतत्रच्या ७२ वर्षानंतर पण या भागाच्या विकास झाला नाही.या भागात अनेक प्रमुख समस्या आवासुन उभे आहेत.या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत,पुल,विज नाहीत,पिण्याचं पाण्याचा समस्या मात्र याकडे लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष केले असल्याने अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.
स्थानिक क्षेत्रातून निवडुन आल्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करत असतात.मात्र या गांवात केव्हाच येत नाही समस्या जाणून घेत नाहीत मात्र श्री.अजयभाऊ कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आहेत कि त्यांनी आम्हच्या गांवात आले आम्हच्या समस्या जाणून घेतले असल्याचे म्हणत अध्यक्ष आल्याच आनंद व्यक्त केले.
नागरिकांसोबत एक तास चर्चा करून समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याच्या ग्वाही देत म्हणाले या भागात अनेक समस्या आहेत नुसता निवडनूकीच्या वेळी अनेकाकडून आश्वासन दिले जातात मात्र ते पूर्ण करत नाहीत आपण या क्षेत्रातून निवडुन आलो नसलो तरी मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने या भागातील समस्या प्राधान्याने सोडवण्याच्या प्रयत्न करू असे सांगताच कुर्ता गावातील सहा कुटुंबाना जीवनावश्यक वस्तु वाटप करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितिचे सभापती श्री.भास्कर तलांडे ,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,प.स.माजी सभापती तथा प.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम,दामरंचाचे सरपंचा सौ.किरण कोडापे,कमलापूरचे सरपंच श्री.श्रीनिवास पेंदाम, ग्राम पंचायत सदस्य श्री.सम्मा कुरसाम,माजी सरपंच श्री.जिलकरशाह मडावी,सुदीप रंगूवार,प्रमोद कोडापे,नरेश मडावी,कार्तिक अल्लाडवार,आदिनी सदर गांवात घेले होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close