ताज्या घडामोडी

तपोभूमी गोंदेडा येथे गुरुदेव कार्यकर्त्यांच्या संकल्प सभेचे आयोजन

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम मोझरी व इतर सर्व ठिकाणांच्या संबंधित आश्रमातील पद, मान-सन्मान, सत्ता, वर्चस्व, स्वार्थ या करिता सुरु असलेला गुरुदेव भक्तातील विवाद, तेथील गलथान कारभार तसेच गटा-गटातील द्वंद युद्ध, हानामारी इत्यादि विकोपाला गेलेल्या परिस्थिती विरुद्ध संघटित होऊन गुरुदेवाचे कार्य एकाच छत्र छायेच्या खाली एकोप्याने करण्याबाबत वंदनीय राष्ट्रासंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदेडा येथे दिनांक 29/05/2022 रोज रविवारला दुपारी ठीक 12.30 वाजता गो-माता सेवक, निष्काम कर्म योगी, गुरुदेव तत्वज्ञान कार्याचे आजीवन प्रचारक ह.भ.प. गवते महाराज यांचे प्रमुख उपस्थित संकल्प सभा आयोजित केलेली आहे.
ज्या गुरुदेव प्रेमी गुरु बंधु-भगिनींना गुरुदेव कार्यातील उपरोक्त मनमानी व नियंबाह्य कारभार बंद होऊन कार्यात सुधारणा व्हावी असे वाटत असेल अशा तमाम गुरुदेव सेवामंडळा च्या प्रत्येक गावातील पाच सक्रिय कार्यकर्त्यांनी स्वयं स्फूर्तीने व स्वखर्चाने सभेला उपस्थित राहण्याची विनंती आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close