लोहगाव येथे लोकशिक्षण सार्वजनिक वाचनालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी तालुक्यातील लोहगाव येथील लोक शिक्षण सार्वजनिक वाचनालयात दिंनाक पंधरा फेब्रुवार रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल शेख हयातभाई यांच्या हस्ते श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभीवादन करण्यात आले .या कार्यक्रमात ग्रंथपाल शेख हयातभाई यांनी संत सेवालाल महाराज यांचा कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमात ग्रंथपाल शेख हयातभाई यांच्यावतीने वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश तायडे,तर प्रमुख पाहुणे म्हणुन बालाजी हजारे ,वैजनाथ धोत्रे ,मून्ना अंभुरे आदी मान्यवर ऊपस्थीत होते .कार्यक्रमाचे संयोजन चंद्रकांत ईंगळे यांनी केले .तर कार्यक्रमास अशोक होळकर ,बालाजी खोंड आदी नागरिक ऊपस्थीत होते . तर आभार मुन्ना अंभुरे यांनी मानले .