समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी पोचविली परसोडा येथे समाज कल्याण विभागाच्या योजनेची माहिती
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती असलेले ‘ विकास पर्व ‘ ही माहीती पुस्तिका जनजागृती , योजनां प्रचार व प्रसार केला
गट ग्रामपंचायत परसोडा. ता. वरोरा जि. चंद्रपूर येथे एस आर एम कॉलेज ऑफ़ सोशलवर्क , चंद्रपुर चा एम एस डब्लू प्रथम वर्षाचा विद्यार्थी आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ परसोडा अध्यक्ष शुभम आमने यांनी १ मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त समाजकल्याण कार्यालय, चंद्रपूर सामाजिक न्याय विभागाच्या जनतेसाठी असलेल्या शासनाच्या योजना मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील साकुरे, समन्मयक डॉ जयश्री कापसे, डॉ देवेंद्र बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी आपल्या मुकामी परसोडा या गावामध्ये चौका-चौकात लोकांच्या गर्दी च्या ठिकाणी जाऊन १) डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २)रमाई आवास (घरकुल) योजना ३)कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ४)गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप योजना ५)मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे ६)युवकांसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना ७)बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजना ८)सामूहिक विवाहासाठी कन्याधान योजना ९)भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना १०)आंतर जातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य असल्या दहा योजना ची माहिती गावातील लोकांना त्यांच्या त्यांना समजेल अशा भाषेत त्या या विद्यार्थ्यांने पटवून दिली. व परसोडा वासियांन कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.