मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी.
पाथरी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवार (दि.20) रोजी पार पडली यात पाथरी विधानसभा मतदारसंघात पुरुष 2 लाख 3 हजार 45 स्त्री 1 लाख 90 हजार 197 तृतीयपंथी दोन एकूण 3 लाख 93 हजार 244 मतदारांपैकी पुरुष 1 लाख 47 हजार 146 स्त्री 1 लाख 31 हजार 958 एकूण 2 लाख 79 हजार 104 ( 70.97 ) टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 23 नोव्हेंबर शनिवार रोजी निकालाची प्रक्रिया सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार असून निवडणूक विभागा ने मतमोजणीसाठी तयारी सुरू केली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांसाठी आज शुक्रवार दुपारी 1 वाजता शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था विटा रोड पाथरी येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मतमोजणी ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था विटा रोड पाथरी येथे 23 नोव्हेंबर ( शनिवार)रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरू होणारा आहे प्रथम टपाली मतपत्रिका व सैन्य दलातील मतदार या मतांची मोजणी होणार असून त्यानंतर ईव्हीएम वरील नोंदवलेले मतदानांची 14 टेबलावर एकूण 30 फेरीत मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रत्येक टेबलावर एक सूक्ष्म निरीक्षक एक मतमोजणी सुपरवायझर व एक मतमोजणी सहाय्यक यांची नियुक्ती केली आहे.
मतमोजणीच्या दिवशी मत मोजण्याचा ठिकाणी सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी सकाळी 7 वाजता शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था विटा रोड पाथरी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
———————–‘—
निवडणूक निरीक्षक संचिता बिश्नोई यांनी ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणची केली पाहणी
पाथरी विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम ठेवलेल्या शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था विटा स्ट्रॉंग रूमची पाहणी केली तसेच मतदान केंद्र अध्यक्षांनी दिलेल्या दैनंदिनी व 17 सी ,वोटर रजिस्टर याची तपासणी उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी प्रतिनिधी समोर तपासणी करण्यात आली
व मत मोजणी ठिकाणची पाहणी केली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री शैलेश लाहोटी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंगाचे माचेवाड तहसीलदार मानवत उपस्थित होते.