विश्व हिंदी दिवस स्व.नितीन महाविद्यालयात साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
स्व. नितीन महाविद्यालय पाथरी जि परभणी. विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राम फुन्ने सर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.भारत निर्वळ डॉ. बोचरे जे एम , हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. खेडेकर मारोती डॉ. मोरे जी जे, प्रा. काळे टि एफ ,ठोंबरे एम डी ,डॉ. हरी काळे ,डॉ. गायके रंजीत इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य राम फुन्ने यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले तसेच प्रमुख वक्ते यानी ही हिंदी भाषेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. हिंदी विभाग अध्यक्ष यांनी ही हिंदी भाषा जन जन की भाषा कशी आहे हे विद्यार्थ्यांसमोर पटवून दिले आहे. विश्व हिंदी दिवस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भिसे डिके यांनी केले. आभार कुमारी इंगळे या विद्यार्थिनीने मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.