कॉग्रेसचे रमेशभाऊ ठाकरे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचा चिमुर येथे भाजपात पक्षप्रवेश
खा. अशोक नेते व आ. कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष रमेशभाऊ ठाकरे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचा चिमुर येथे भाजपात पक्षप्रवेश
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
भाजपा महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने खास मकरसंक्रांतीनिमित्त महिला-भगिनींसाठी अभ्यंकर मैदान (किल्ला) चिमूर येथे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाप्रसंगी *खा. अशोक नेते व आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया * यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष रमेशभाऊ ठाकरे यांच्यासह महेश अलबनकर, रवि जांभुळकर, मंगेश कुंभारे, राहुल वाघाडे, सलमान पठाण, गौरव केणे व अन्य सहकारी कार्यकर्त्यांनी *देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदी * यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक एक पाऊल आत्मविश्वासाने टाकत आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विकासाचा ध्यास असलेले राज्यातील नेतृत्व * उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने,सांस्कृतिक कार्य,मत्स्य व्यवसाय,तथा पालकमंत्री म.रा. खासदार’ अशोक नेते, आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांच्या कार्यकर्तृत्वावर व विकसनशील ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार अशोक नेते व आमदार बंटीभाऊंनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशाप्रसंगी विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.