देवस्थानच्या रस्त्याची दुरुस्ती हे पुण्यचं -ह भ प नागनाथ महाराज
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
देवस्थानच्या रस्त्याची दुरुस्ती करणे हे पुण्याचं काम आहे ते काम करण्याची संधी मिळायला नशीब लागतं. असं मत ह.भ.प. नागनाथ महाराज दत्तवाडीकर यांनी शनिवारी व्यक्त केलं.
गंगाखेड तालुक्यातील प्रसिद्ध दत्तोबा संस्थान शंकरवाडी दत्तवाडी या ठिकाणी दर गुरुवारी महाआरती साठी हजारो भाविक भक्त जमतात. पण या संस्थानाकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे भाविक भक्तांची खूप मोठी अडचण होत होती. शनिवारी केनल च्या बाजूचा रस्ता दुरुस्तीचा प्रारंभ नागनाथ महाराज यांच्या हस्ते नारळ फोडून झाला. यावेळी या रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार घेणारे सखाराम बोबडे पडेगावकर, मुंजाभाऊ लांडे आदींसह परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नागनाथ महाराज म्हणाले की दत्तोबा संस्थान हे परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पुढील आठवड्यात याठिकाणी सप्ताह होत आहे .या सप्ताहसाठी येणाऱ्या भाविक भक्तांना त्रास होऊ नये यासाठी हा तात्पुरता रस्ता दुरुस्ती होणे आवश्यक होती ते काम सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी केलेल आहे. आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या भागातील देवस्थानांचे प्रगतीसाठी लागणाऱ्या रस्ता, वीज ,पाणी आदी सोयी उपलब्ध करून देणे परिसरातील राजकीय कार्यकर्त्यांच्या जबाबदारी आहे. या संस्थानात दोन वर्षापूर्वी दर गुरुवारी बस सुरू करण्याचा प्रयत्न सखाराम बोबडे पडेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. पण तो रस्त्या अभावी यशस्वी होऊ शकला नव्हता .आज रस्ता होत असल्याने खूप आनंदाचा क्षण असल्याचे महाराजांनी सांगितले. बालूदादा करवर, रमेश मुलगीर आदीसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते