अखेर नेरी येथील स्मशानभूमीला अनेक वर्षांनी मिळाला न्याय
ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
तालुका प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमुर तालुक्यातील नेरी येथील स्मशान भुमिला आता चांगले दिवस आल्याचे स्पष्ट झाले
मागील अनेक वर्षापासुन या स्मशान भुमीवर काहींनी अवैध रित्या अतिक्रमण केले असल्याने आणी शेती केली जात असल्याने गावकऱ्यांना अनेक समस्या सहन करावा लागल्या
ही स्मशानभूमी आपल्या सुधारणेसाठी अश्रु ढाळीत होती परंतू वर्तमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सरकारी रेकॉर्ड उपलब्ध करून ही अतिशय महत्त्वाची जागा गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे
हे यापूर्वीच व्हायला पाहिजे होते परंतु आजवर याकडे कोणीही लक्ष दिले नाही यामुळे समस्या होती तसीच राहिली
येथील महिला व पुरुष ग्रा.पं.सदस्यांनी जोर देत हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उचलून धरला त्याचा पाठपुरावा केला असे केले नसते तर हा प्रश्न आहे तसाच राहीला असता
स्मशानभूमीत काही मनुष्य वस्ती नसते ,ते अखेरचे विश्राम धाम आहे याची जाणीव राखून हा प्रश्न रेकॉर्ड प्रमाणे आज दि १३-५-०२२ रोजी मोजमाप करून जागेचे सपाटीकरण केल्या गेले व जागा निर्धारित करण्यात आली.
विकास कामे करण्याचे हे एक चांगले उदाहरण आहे गावकऱ्यांची समस्या ओळखुन हे पाऊल उचलल्या गेल्याने भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी हे सोयीचे झाले आहे
महिला ग्रा प.सदस्यांना पुरुष सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले एकमेकाच्या विचाराने व सहकार्याने ही स्मशानभूमी ची समस्या सोडवता आली ह्यात प्रामुख्याने सरपंच रेखा पिसे,उपसरपंच चंद्रभान कामडी, ग्रा.पं. सदस्य सौ.पद्मश्री संजय नागदेवते,संगीता कामडी, संगीता वैरागडे,साधना दडमल , गराटे बाई,पद्मा झिले,राजु घोनमोडे,पिंटु खाटीक व संर्व ग्रा.पं. सदस्यांचा यात सहभाग होता.