ग्रामगीता महाविद्यालयाची इंद्रधनुष्य – 2023 मध्ये सुयश
प्रतिनिधीःराहुल गहुकर
ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मध्ये दिनांक 17-10- 2023 ते 19-10-2023 दरम्यान आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय इंद्रधनुष्य-2023 स्पर्धेमध्ये संपूर्ण विद्यापीठात सगळ्यात जास्त तब्बल बारा पारितोषिक जिंकत जोरदार यश प्राप्त केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इंद्रधनुष्य-2023 मध्ये विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. प्रहसन स्पर्धेत कु. गौरी चंदनखेडे व चमू, स्थळ चित्र स्पर्धेत कु.आरती आरके यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सुगम संगीत मध्ये कु. साक्षी कौरासे, मूकनाट्य स्पर्धेत कु. मयुरी डांगे व चमु, नक्कल मध्ये पृथ्वीराज नन्नावरे, लोकनृत्य या स्पर्धेत कु. वैष्णवी गायकवाड व चमु यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच समूहगीत स्पर्धेत निकेत सुखदेवे व चमु, एकांकिका स्पर्धेत कु.लक्ष्मी पिंपळकर व चमु, पाक्षिमात्य गायन सोलो या स्पर्धेत निकेत सुखदेवे, पोस्टर मेकिंग मध्ये कु. आरती आरके या स्पर्धकांनी तृतीय क्रमांक प्राप्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धम्मानी यांनी महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. महाविद्यालयातील जवळपास १९ विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मार्गदर्शक श्री.सचिन भरडे यांनी खूप कठीण परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग अधिकारी प्रा. समीर भेलावे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. बिजनकुमार शिल, आय.क्यू .ए .सी. समन्वयक डॉ. निलेश ठवकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. युवराज बोधे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी पाठिंबा दिला.